Home Breaking News हिंगोली जिल्हा सकाळीच भुकंपाने हादरला! एकच खळबळ

हिंगोली जिल्हा सकाळीच भुकंपाने हादरला! एकच खळबळ

148
0

पुणे दिनांक २२ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता सकाळीच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.हिंगोली मधील वसमत. कळमनुरी.या तालुक्यातील काही गावांना आज मंगळवारी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे.दरम्यान या भूकंपाची तीव्रता ही ३.८ रिश्टर स्केल आहे.तर या भूकंपाचा केंद्रबिंदू हा नांदेड जिल्ह्यात असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सकाळीच अचानकपणे झालेल्या भूकंपामुळे अनेक नागरिकांनी घाबरून त्वरित घराबाहेर पळ काढला आहे.सध्या या गावात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान या भूकंपात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.तसेच वित्तहानी झालेली नाही.दरम्यान यापूर्वी देखील या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत.

Previous articleकसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल
Next articleपुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर इनोव्हा कारमध्ये सापडली ५ कोटींची रक्कम, आमदार शहाजी पाटील रक्कमशी माझा संबंध नाही,दोन गाड्यांमध्ये १५ कोटी एक गाडी पोलिसांनी सोडली खासदार संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here