Home Breaking News कोपरी पाचपाखाडी मधून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघेंचे वारसदार केदार दिंघेना...

कोपरी पाचपाखाडी मधून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघेंचे वारसदार केदार दिंघेना उमेदवारी, उध्दव ठाकरेंची राजकीय खेळी

56
0

पुणे दिनांक २३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच घेण्यासाठी शिवसेना उध्दव ठाकरे यांनी एक चांगलीच राजकीय खेळी खेळली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघा मधून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. याच पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाच्या वतीने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे व वारसदार केदार दिघे यांना आज उध्दव ठाकरे गटाच्या वतीने एबी फाॅर्म दिला असून ते पाचपाखाडी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान काही वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्या नंतर ठाण्यातील केदार दिघे यांनी उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला.त्या नंतर उध्दव ठाकरे यांनी देखील त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत जिल्हा अध्यक्षपद दिले.तसेच केदार दिघे यांनी लोकसभेला ठाकरेंसाठी चांगले काम केले आहे.आता केदार दिघे यांना आता उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यातील पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात उतरवणार आहे.दरम्यान केदार दिघे हे ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत.तसेच सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाचे आमदार आहेत.तसेच या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वर्चस्व आहे.दरम्यान याच वर्चस्वाला सुरुंग लावण्या साठी ठाकरेंनी खास व्युहरचना आखली आहे.कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात केदार दिघे यांचं तिकीट निश्चित मानले जात आहे.त्यांना एबी फाॅर्म देखील देण्यात आला आहे.असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.त्यामुळे आता कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे यांच्यात सामना होईल  मिळालेल्या माहितीनुसार.केदार दिघेंनी ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उध्दव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केदार दिघेंना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल तर ठाणे शहरांतून माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाचा विचार उध्दव ठाकरे गटाकडून सुरू आहे.

Previous articleशिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटात नात्या-गोत्यातील लोकांनाच विधानसभा उमेदवारी
Next articleबंगळुरूमध्ये ७ मजली इमारत कोसळून ५ जणांचा मृत्यू १३ जणांची सुखरूप सुटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here