पुणे दिनांक २३ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. महाराष्ट्रात विधान सभा निवडणुका साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत नात्या -गोत्यातील लोकांना स्थान देण्यात आले आहे.निष्ठावंत शिवसैनिक या उमेदवारी पासून वंचित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.यात शिवसेनात बंड करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणा-या काही आमदारांना देखील या पहिल्या यादीत स्थान देण्यात आले नाही.
दरम्यान या यादीत उदय सामंत यांचे बंधू किरण सांमत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.तसेच खासदार संदीपान भुमरे यांच्या चिरंजीवाला पैठण येथून उमेदवारी दिली आहे.तसेच आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुनील बाबर यांना उमेदवारी दिली आहे.विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील.व आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ यांना विधानसभा मध्ये उमेदवारी दिली आहे.एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मधील नात्या – गोत्यात उमेदवारी दिल्याचे पाहायला मिळत आहे.यात कुणाचा मुलगा कुणाचा भाऊ तर कुणाची पत्नी असे सर्व विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.मात्र सर्व सामान्य शिवसैनिक याला वा-यावर सोडल्याचे दिसत आहे.