Home Breaking News अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकीचा पक्ष प्रवेश.७ जणांची उमेदवारी जाहीर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकीचा पक्ष प्रवेश.७ जणांची उमेदवारी जाहीर

69
0

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) झिशान सिद्दीकी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.दरम्यान पक्षप्रवेशा नंतर प्रतिक्रिया देताना झिशान म्हणाले की मला महाविकास आघाडीच्या वतीने तिकिट देण्यात आले. पण ही जागा शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या गटाकडे गेली आहे.हे अत्यंत दुर्दैवी आहे.दरम्यान या कठीण काळात माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी अजित पवार व प्रफुल्ल पटेल.तसेच सुनिल तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो.तसेच सदरची जागा आम्ही रेकॉर्ड मताने जिंकू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाच्या ७ जणांची उमेदवारी जाहीर केली आहे.१) निशिकांत पाटील- इस्लामपूर २) संजयकाका पाटील – तासगाव ३) प्रताप चिखलीकर – लोहा-कंधार ४) सना मलिक – अणुशक्तीनगर ५) सुनील टिंगरे –  वडगावशेरी ६) झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व ७) ज्ञानेश्वर कटके -शिरुर हवेली.या प्रमाणे आहेत.

Previous articleतोतया पोलिसांनी पुण्यातील दोन जेष्ठ नागरिकांची ७० लाख रुपयांची ऑनलाइन केली फसवणूक
Next articleआज पहाटे अर्टिगा कारची डंपरला पाठीमागून जोरात धडक कारचा चक्काचूर तीनजणांचा घटनास्थळीच मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here