पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा लाॅरेन्स बिश्नोई व त्यांची गॅंग चर्चा मध्ये आली आहे.दरम्यान याच गॅंगने दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी मुंबईत बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली आहे.त्यामुळे ही बिश्नोई गॅंग पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान या हत्या नंतर लाॅरेन्स बिश्नोई गॅंगच्या अडचणी मध्ये चांगलीच वाढ झाली आहे.आता या गॅंगचा गोल्डी ब्रारनंतर लाॅरेन्स बिश्नोई यांचा भाऊ गॅंगस्टर अनमोल बिश्नोई याच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे.त्याला NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणाने अनमोल बिश्नोई याला मोस्ट वाॅन्टेड यादीत समावेश करुन त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात अनमोल याचे नाव पुढे आले आहे.
दरम्यान NIA ने कुख्यात गॅंगस्टर लाॅरेन्स बिश्नोई यांचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या बद्दल माहिती देणा-या व्यक्तीला १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.दरम्यान ‘ भानू’ या नावाने ओळखला जाणारा अनमोल बिश्नोई हा बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातून पळून गेला होता.गेल्या वर्षी तो केनियात तर यावर्षी तो कॅनडामध्ये दिसला होता. दरम्यान बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणात अनमोल बिश्नोई हा शूटर्स यांच्या संपर्कात होता.तसेच तो कॅनडा व अमेरिका मधून काम करत असताना आरोपींच्या संपर्कात राहण्यासाठी तो स्नॅपचॅट या सोशल मीडिया अॅपचा वापर करत होता.असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.