पुणे दिनांक २५ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पोलिसांची सर्वत्र नाकाबंदी आहे.हिंगोली शहरांमध्ये इनोवा कारमध्ये १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे.दरम्यान सदरची रक्कम ही एका बॅंकेची असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास हिंगोली शहर पोलिस करीत आहेत.
दरम्यान राज्यात सर्वत्र विधानसभेच्या निवडणुका लागल्या मुळे.तसेच आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरात सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.तसेच शहरातील मोक्याच्या ठिकाणी चौकात पोलिसांनी 👮 नाकाबंदी सुरू केली आहे.शहरात येणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.दरम्यान हिंगोली शहरातील एसटी बस स्थानकात पोलिसांनी एका इनोव्हा कार मधून १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.दरम्यान आचारसंहिता लागू असताना एवढी मोठी रक्कम कशी काय आली याचा तपास आता पोलिस करत आहेत.दरम्यान सदरची रोकड ही एका बॅंकेची असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.