पुणे दिनांक २६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर जिल्ह्यातील काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या बाबत संगमनेर येथील धांदरफळ येथील भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे यांच्या सभेत भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने संगमनेर तालुक्यातील वातावरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच गरम झाले आहे.त्यातच काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व जयश्री थोरात यांनी या विधानाचा निषेध केला आहे.रात्रभर त्या संगमनेर पोलिस स्टेशन समोर बसून होत्या.त्यांनी यावेळी भाजपचे वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.अखेर पहाटेच्या सुमारास वसंतराव देशमुख यांच्यावर पोलिसांनी 👮 गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे नेते वसंतराव देशमुखांवर जयश्री थोरात यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी आज शनिवारी पहाटे गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भारतीय जनता पक्षाचे नेते सुजय विखे यांच्या सभेत भर स्टेजवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त विधान केल्याने यावेळी संतप्त झालेल्या काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहनांची तोडफोड व जाळपोळ केली.तसेच संगमनेर तालुका पोलिस स्टेशन समोर बसून शुक्रवारी रात्री ठिय्या आंदोलन केले.दरम्यान याच प्रकरणी काॅग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी सकाळी संगमनेर मध्ये निषेध मोर्चा काढला जाणार आहे.