पुणे दिनांक २६ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट अहिल्यानगर जिल्ह्यातून येत असून दरम्यान संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात एका सभेत विखे व थोरात यांच्यातील वाद टोकाला गेला आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे सुजय विखे यांच्या सभेत काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते.धांदरफळ येथील कार्यकर्ते वसंत देशमुख यांच्या कडून जयश्री थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती.दरम्यान वसंत देशमुख यांच्या वक्तव्यानंतर काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले आहेत. या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे आज आमनेसामने आले. व या नंतर अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड व जाळपोळ करण्यात आली आहे.दरम्यान जाळपोळ नंतर संगमनेर नगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने या गाड्याची 🔥 आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.