पुणे दिनांक २७ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक मुंबईतून खळबळजनक अपडेट हाती आली असून.आज रविवारी मुंबईतील वांद्रे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे.दरम्यान या चेंगराचेंगरीत ९ प्रवासी हे जखमी झाले आहेत.तर जखमी प्रवाशांमध्ये दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वांद्रे – गोरख पूर एक्स्प्रेस गाडी मध्ये चढताना दिवाळी निमित्ताने गावी जाणा-या प्रवाशांची मोठ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान रेल्वे एक्स्प्रेसमध्ये डब्यात जागा मिळण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केल्याने या गर्दीत धक्काबुक्की मोठ्या प्रमाणावर झाली होती.यात एकूण नऊ प्रवासी हे जखमी झाले आहेत.जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी वांद्रे येथील भाभा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमी मध्ये दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान या प्रकरणी बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापनाकडून माहिती देण्यात आली आहे.दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिवाळी निमित्त बाहेर गावी जाणा-या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एक्स्प्रेस रेल्वे ट्रेनला जादा रेल्वेच्या फे-या सुरू कराव्यात तसेच त्या ट्रेनला सामन्य प्रवासी साठी जनरल बोंग्या लावाव्यात ही घटना रेल्वेच्या गलथान कारभारामुळे घडली आहे.अशी चर्चा रेल्वे प्रवाशां मध्ये आहे.