पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता पुणे जिल्ह्यातून एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.सध्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे याच दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघांत जादूटोणा होत असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.दरम्यान आता अनेक पक्षाच्या राजकीय नेत्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे.अशातच आता नारायणगाव येथे अनेक ठिकाणी तीन धारी लिंबू 🍋 कापून त्याच्यामध्ये गुलाल भरून ते रस्त्यावर फेकण्यात आले आहे.तसेच अन्य ठिकाणी गोळेगाव फाटा.तसेच पांगरी माथा व ओतूर रोडवर हा लिंबू 🍋 डावचा अघोरी प्रकार करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणा मागील कारण अद्याप समोर आले नाही.पण गावांमधील लोकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.