Home Breaking News पुण्यात सिंहगड रोड येथील न-हे भागात ड्रेनेजवर फटाके 🎆 फोडताना मोठा स्फोट...

पुण्यात सिंहगड रोड येथील न-हे भागात ड्रेनेजवर फटाके 🎆 फोडताना मोठा स्फोट ५ मुले जखमी

75
0

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुण्यातील सिंहगड रोड न-हे येथून अपडेट आली असून.येथील एका सोसायटी मधील ड्रेनेज लाईनवर झाकणावर फटाके 🎆 फोडतां ना चेंबरमधील गॅसमुळे अचानकपणे मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला.या स्फोटात एकूण ४ ते ५ मुले जखमी झाले आहेत.दरम्यान या घटनेनंतर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

दरम्यान या घटनेनंतर सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेबाबत सिंहगड रोड पोलिसांनी 👮 दिलेल्या माहितीनुसार न-हे येथील मानाजी नगर येथील गौरांग रेसिडेन्सी येथील आवारात लहान मुलं दिवाळी निमित्त ४ ते ५ मुलं ही फटाके 🎆 फोडताना ड्रेनेच लाईन वरील चेंबरवर फटाके उडवताना ड्रेनेज लाईनवरील चेंबरमधील गॅसमुळे अचानकपणे मोठ्या प्रमाणावर स्फोट झाला.तसेच आगीचा मोठा गोळा हवेत उडाला यात ड्रेनेज लाईनवरील झाकण उडाले या दुर्घटनेत ४ ते ५ मुलं जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने पालकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित घटनेची माहिती घेतली आहे.दरम्यान सदरची घटना ही सोसायटी मधील 📷 कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.व या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. पालकांनी आपली मुलं फटाके उडवत असताना मुला मुलांबरोबर थांबणे गरजेचे आहे.तसेच वीजांच्या तारा.तसेच ड्रेनेज लाईनवर. दुचाकी व चारचाकी वाहनांजवळ फटाके 🎆 फोडू नये.तसेच पालकांनी देखील यांची दखल घ्यावी असं आवाहन पुणे पोलिसांनी 👮 तसेच पुणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleनवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून एबी फाॅर्म मिळाला मानखुर्द शिवाजीनगर येथून अर्ज दाखल करणार
Next articleपुणे जिल्ह्यात विधानसभेच्या रणधुमाळी मध्ये जादुटोण्याचे प्रकार एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here