Home Breaking News भारतीय जनता पार्टीचे गोपाळ शेट्टी आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार

भारतीय जनता पार्टीचे गोपाळ शेट्टी आज अपक्ष उमेदवारी दाखल करणार

122
0

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे नेते गोपाळ शेट्टी हे आज बंड करून बोरिवली विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला हा सर्वात मोठा धक्का बसणार आहे.दरम्यान गोपाळ शेट्टी हे इच्छुक उमेदवार असताना देखील भारतीय जनता पार्टीने बोरिवली येथून संजय उपाध्यक्ष यांना तिकीट देण्यात आले आहे.तसेच बाहेरच्या उमेदवारला बोरिवली मध्ये तिकीट देण्यात आले.त्यामुळे या विधानसभा मतदार संघात स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.तसेच तिकीट न मिळाल्याने गोपाळ शेट्टी देखील नाराज झाले आहेत.काल त्यांची भारतीय जनता पार्टीचे अनेक नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण गोपाळ शेट्टी हे अपक्ष  लढण्यावर ठाम आहेत.ते आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविणार आहेत.असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

Previous articleविधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
Next articleमंदिरात भाविकांमध्ये भीषण चेंगराचेंगरीत १५० पेक्षा जास्त जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here