पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.केरळ येथील कासारगोड येथील एका मंदिरात सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्यांच्या आताषबाजी करताना भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चेंगराचेंगरी झाली आहे.यात १५० पेक्षा जास्त भाविक हे जखमी झाले आहेत.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते.यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.त्यानंतर 🔥 आग लागली होती.दरम्यान आग लागल्यानंतर भाविकां मध्ये पळापळ सुरू झाली व त्यांतच चेंगराचेंगरी होऊन ही मोठी दुर्घटना घडली आहे.दरम्यान यात जखमी झालेल्या भाविकांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.यात काही भाविक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.