पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.माझ्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर माझी खुली चौकशी करण्यात यावी.असा शेरा मारुन त्या फाईल वर गृहमंत्री आर आर पाटील यांनी सही केली होती. असे अजित पवार यांनी म्हटले आहे.तसेच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला.भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जलसिंचन विभागात ७० हजार कोटींचा घोटाळा केला असे आरोप केले. दरम्यान घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाईची फाईल त्यावेळी गृहमंत्री असलेल्या आर आर पाटील यांच्याकडे गेली.असेही अजित पवार या म्हणाले आहेत.
दरम्यान सिंचन घोटाळा प्रकरणातील कारवाईच्या फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांची सही होती.असे अजित पवार यांनी आज म्हणले आहेत दरम्यान यावरून आता जेष्ठ नेते शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.मागील पाच वर्ष हे झोपले होते का ? तेव्हा तुमचे तोंड बंद होते का ? त्यांचं सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम वाढले आहे.दरम्यान आर आर पाटील यांचे निधन झाल्याने त्या माणसा बद्दल वाईट बोलणे चुकीचे आहे.असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.