पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) भारतीय जनता पार्टीचे विरोधानंतर देखील आमदार नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीने आज मंगळवारी सकाळी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून एबी फाॅर्म देण्यात आला आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने कालच त्यांची मुलगी सना मलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान महायुतीत मानखुर्द शिवाजीनगर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे यांच्या गटाकडे आहे.
दरम्यान नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी देण्यात विरोध होता. तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाच्या वतीने आज सकाळीच अधिकृत उमेदवारी देऊन एबी फाॅर्म देण्यात आला आहे.दरम्यान नवाब मलिक हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.त्यांनी गळ्यात गुलाबी रंगाचे उपरणं घातले आहे.दरम्यान मानखुर्द शिवाजीनगर हा विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाकडे आहे.तर शिंदे गटातून या विधानसभा मतदारसंघात शिवाजी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.आता महायुती मध्ये आता मलिक यांच्या उमेदवारी नंतर आता खटके उडण्याची शक्यता आहे.