पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.पालघर विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनाचे आमदार श्रीनिवास वनगा यांचे विधानसभे चे तिकीट मुख्यमंत्री शिंदे यांनी कापल्यानंतर वनगा हे प्रचंड नाराज झाले होते.ते काल ढसाढसा 😭 रडत होते .ते काल संध्याकाळी घरातून बाहेर निघून गेले . ते अद्याप घरी परतले नाहीत.त्यांचे दोन्ही फोन बंद आहेत.सध्या पोलिस प्रशासन व वनगा यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे तिकीट कापल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नी यांच्या बरोबर फोन द्वारे संपर्क साधला व वनगा यांचे राजकीय पूनर्वसन करुन त्यांना विधानपरिषदेवर घेणार असं सांगितलं आहे.पण वनगा यांच्या बरोबर मुख्यमंत्री शिंदे यांचा संपर्क होऊ शकला नाही असे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.