Home Breaking News सदा सरवणकर आज माहिम येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार

सदा सरवणकर आज माहिम येथून उमेदवारी अर्ज दाखल करणार

51
0

पुणे दिनांक २९ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.दरम्यान मुंबईतील माहिम विधानसभा निवडणूक मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या विरुद्ध लढण्यावर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार सदा सरवणकर हे ठाम असून ते आज मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये या साठी सरवणकर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण या बाबत त्यांच्या बरोबर बैठका देखील घेतल्या पण सदा सरवणकर हे निवडणूक लढविणार ठाम आहेत.ते आज मोठे शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.आता राजकीय घडामोडींना वेग आला असून आता महायुतीचे नेते कोणता निर्णय घेतात हे पहावे लागेल.दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधानसभेच्या १० जागा मागितल्या आहेत अशी माहिती देखील सूत्रांकडून समजत आहे.

Previous articleमुख्यमंत्री शिंदे यांनी तिकीट कापले,१२ तासांपासून श्रीनिवास वनगा नाॅट रिचेबल
Next articleनवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून एबी फाॅर्म मिळाला मानखुर्द शिवाजीनगर येथून अर्ज दाखल करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here