पुणे दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या बरोबर नाचणा-या भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान आमदार संदीप धुर्वेंना आता चांगलेच महागात पडलं आहे.अशी चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात रंगली आहे.दरम्यान काही महिन्यांपूर्वी दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार संदीप धुर्वेंनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या सोबत स्टेजवर डान्स केला होता.दरम्यान त्याचवेळी महाराष्ट्रात ओला दुष्काळ होता तसेच बळीराजा हा संकाटात होता. आणि हे भारतीय जनता पार्टीचे आमदार स्टेजवर भर पब्लिक समोर नृत्यांगना बरोबर नाचत होते.त्यामुळे हे आमदार महाशय चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.आता त्याच धुर्वे आमदारांचे तिकीट या विधान सभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे वतीने कापण्यात आले आहे.आणि या मतदारसंघात पूर्वीचे माजी आमदार राजू तोडसाम यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिकिट दिले आहे.
य