पुणे दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून मुंबईतून अपडेट हाती येत असून.मी मागील ४० वर्षांपासून शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ते आहे.आम्ही आमच्या कष्टाने तसेच घामाने तीन वेळा या सलग माहिम या मतदारसंघातून आमदार झालो आहे.दरम्यान हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी आपल्या नातेवाईकांसाठी ही सीट सोडायला सांगितलं नसतं.असे शिवसेनाचे आमदार सदा सरवणकर यांनी म्हटले आहे.तसेच मी राजसाहेबांना मी विनंती करतो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करु नका.मला आपले समर्थन द्या.असेही त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.