पुणे दिनांक ३० ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली आहे.सन २०२४ मध्ये भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होईल.तर सन २०२९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेचाच मुख्यमंत्री होईल.असा दावाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक भविष्यवाणी केली आहे.दरम्यान विधान सभा निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या विरोधात माहिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणे हा लोकशाहीमध्ये हा प्रत्येकांचा सभाव आहे. व तो त्याच्या स्वभावानुसार वागत आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टी सारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळून शकते तसेच सर्वांनाच कळेल असं नाही.आपण कुणाला कुठे आणि किती सांगायला जाणार.असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान माहिम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे प्रथम निवडणूक लढवत आहेत.त्यांना शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा देवा अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती.पण शिंदे गटाचे माहिम येथील उमेदवार सदा सरवणकर यांनी पाठिंबा देण्यासाठी राजकीय स्तरावर प्रयत्न झाले पण सदा सरवणकर हे यांनी पाठिंबा देण्यासाठी नकार दिला आहे.व ते स्वतः माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार ठाम आहे.आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर दुसरीकडे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून पाठिंबा दिला आहे.तसेच उध्दव ठाकरे गटाच्या वतीने देखील या मतदारसंघात आपला उमेदवार दिला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या चिरंजीव साठी राज ठाकरे हे प्रयत्न करत आहे.आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या चिरंजीवाला पाठिंबा दिला आहे.त्या पक्षाचे गुणगान राज ठाकरे करत आहेत.एवढं समजणं एवढी राज्यातील जनता मुर्ख आहे का ? हा एक प्रश्न सर्वच राजकीय नेत्यांन बरोबर सर्व सामान्य जनतेला पडला आहे.जो आपल्या बरोबर आहे.तो आपला आणि तोच राज्याचा मुख्यमंत्री होणार अशी भूमिका घेणं आणि तशी भविष्यवाणी करणं याला आता काय म्हणायचं असा एक राजकीय प्रश्न आहे.दरम्यान माहिम या विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणां-या उमेदवाराला मला पाठिंबा द्या म्हणणं कितपत योग्य आहे.