पुणे दिनांक ३१ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काॅग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता भाष्य केलं आहे.दरम्यान सिंचन घोटाळा हा काय अजित पवार यांची पाठ सोडत नाही.यावेळी बोलताना काॅग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की मी मुख्यमंत्री असताना जेव्हा सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश सिंचन खात्याला दिला होता.दरम्यान मी माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळा मध्ये कधीच ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता.व तसेच कुठल्याही फाईलवर माझी सही नाही.तरी माझा नहाक बळी घेतला आणि सन २०१४ या कालावधीत अजित पवार यांनी माझं सरकार पाडलं,असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.