पुणे दिनांक ३१ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिवाळीचा सण पुण्यात उत्साहात सुरू आहे.उद्या शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबरला लक्ष्मी पूजन आहे.त्यामुळे उद्या पुणे मेट्रो सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.दरम्यान पुणे मेट्रो तिच्या निर्धारित वेळेत म्हणजेच सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे.महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी निमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.अशी माहिती मेट्रो प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.