पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक हाती मुंबईतून अपडेट आली असून ती प्रवासी संदर्भात आहे.दिवाळी सण सुरू आहे.व उद्या रविवारी दिनांक ३ नोव्हेंबर रोजी बेस्ट बस कर्मचारी यांनी संप पुकारला आहे.दरम्यान उद्या बस डेपोतून एकही बस बाहेर पडणार नाही.दिवाळी संपली सर्वांना दिवाळीचा बोनस मिळाला फक्त मुंबई बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळाला नाही. त्यामुळे बेस्टचे कर्मचारी हे आता आक्रमक झाले आहेत. दरम्यान उद्या भाऊबीजेच्या दिवशी एकही बस बाहेर रस्त्यावर दिसणार नाही.असाच इशारा बेस्ट बस कर्मचाऱ्यांनी दिला आहे.त्यामुळे आता तत्काळ यावर प्रशासन या बंदवर तोडगा काढणार की उद्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप होणारच हे पहावे लागणार आहे.