पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून आगळी वेगळी अपडेट हाती आली असून.बारामती येथे काट्याची वाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांच्या निवासस्थानी आजच्या पाडव्या पासून स्वतंत्र पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.त्यामुळे आज शनिवारी सकाळ पासूनच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.तर एका कार्यकर्त्याने तर लाडक्या अजित दादांसाठी चक्क थेट सोन्याची मिठाई 🍩 आणली आहे.सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली असल्याचे या कार्यकर्त्याने यावेळी म्हणाले आहे.दरम्यान ही सोन्याची मिठाई बनविण्या साठी एक आठवड्यांचा कालावधी लागला आहे.तसेच ही मिठाई खास पुण्यातून बनवून घेतल्याचे या कार्यकर्त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.