पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आली आहे.राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका पार पडणार आहे.दिनांक ४ रोजी उमेदवारी मागे घेण्याची वेळ आहे त्यामुळे उमेदवाराची प्रचारासाठी लगबग सुरू झाली.त्यात दिवाळी सणा मुळे प्रचार यंत्रणा थंडावले आहेत.मात्र आता प्रचारा साठी आता फक्त जेमतेम १४ दिवसच राहिले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहचण्या साठी उमेदवारांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेतल्या नंतरच कोणासोबत कोणाची लढत हे चित्र स्पष्ट होईल व ५ नोव्हेंबर पासूनच प्रचाराला सुरुवात होईल.१८ नोव्हेंबर पर्यंत प्रचार करता येणार आहे.दरम्यान राज्यांमध्ये २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.