पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बारामतीत आज पवारांच्यात दोन दिवाळी पाडवे साजरे केले जाणार आहेत.दरम्यान मागील काही वर्षांपासून जेष्ठ नेते शरद पवार हे माळेगाव येथील गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांना मोठ्या प्रमाणावर नागरिक कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच नेतेमंडळी हे भेटणार आहे.ही परंपरा खुप जुनी आहे.तर या वर्षांपासून प्रथमच काटेवाडी येथील निवासस्थानी अजित पवार हे देखील दिवाळी पाडवा करणार आहेत.तिथे नागरिक व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांना भेटणार आहेत. एकंदरीत या वर्षांपासून बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे.दरम्यान नात्यानंतर आता पवारांच्यात सणात देखील फूट पडली आहे. तर आज शनिवारी पाडवा असल्याने गोविंद बागेत शरद पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे.तसेच गोविंद बागेत होणा-या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान मागील गेल्या ५० वर्षांपासून बारामतीत जेष्ठ नेते शरद पवार दिवाळी सण साजरा करतात.दिवाळी पाडव्याला गोविंद बागेतील त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी आणि स्नेहींना ते भेटतात.ती एक परंपरा आहे.दरम्यान राजकीय संघर्षानंतर यंदा मात्र पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडवे होणार आहेत.त्यामुळे आता सणात देखील पवारांच्यात फूट पडली आहे.दरम्यान काका पुतण्या मधील राजकीय संघर्ष हा शिगेला पोहोचला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबात देखील मोठी दरी निर्माण झाली आहे. दरम्यान दरवर्षी गोविंद बागेत पवार कुटुंबाचा पाडवा साजरा होतो.व राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरिक पाडव्यानिमित्त पवारांची भेट घेतात … या पाडव्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असतं या वर्षी मात्र ते चित्र नसणार आहे.