पुणे दिनांक २ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक पुणे जिल्ह्यातील सुपा येथून खळबळजनक अपडेट हाती आली असून.विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्या नगर ते पुणे महामार्गावर सुपा टोलनाक्यावर तब्बल २३ कोटींचे सोन्याचे दागिने तसेच चांदी तसेच हि-यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.दरम्यान टोल नाक्यावर पोलिसांचे पथक हे येणा-या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी दरम्यान हे दागिने सापडले आहेत.सापडले ल्या दागिन्यांचा आता पंचनामा करून ते आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.दरम्यान सापडलेल्या दागिन्यांमध्ये सोन्या व चांदीच्या विटा तसेच हि-यांच्या दागिन्यांचा समावेश आहे.या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणावर २३ कोटींचे सोन्याचे दागिने सुपा येथील टोलनाक्यावर सापडल्या नंतर एकच खळबळ उडाली आहे.