पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.अपक्ष उमेदवाराचे त्यांच्या कुटुंबीसह शिर्डी येथून अपहरण करण्यात आले आहे अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला आता अवघे काही तास फक्त शिल्लक राहिले आहेत.उद्या दिनांक ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.त्याअधीच एक खळब जनक वृत्त हाती आले आहे.अपक्ष उमेदवार त्यांची पत्नी.बहीण आणि मेव्हण्याचं अपहरण करण्यात आले आहे.दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील अपक्ष उमेदवार राजू शिंदे यांचे त्यांच्या कुटुंबासह अपहरण करण्यात आले आहे.ते शिर्डीतून नाशिककडे जात असताना त्यांचे अपहरण करण्यात आले आहे.