पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडखोरी करणारे अमित घोडा मागील २४ तासांहून नाॅट रिचेबल आहेत. दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी देण्यात आली त्या नंतर अमित घोडा यांनी पालघर विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन बंडखोरी केली आहे.दरम्यान घोडा यांनी अर्ज मागे घ्यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला जात होता.तरी या घोडा हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.त्यामुळे ते अर्ज मागे घेण्याच्या दोन दिवशी आधीच गायब झाले आहेत.त्यामुळे आता पालघर मध्ये महायुतीत बंडखोरी अटळ आहे.