पुणे दिनांक ३ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटाचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आता काही वेळा पूर्वीच अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.मागील दोन दिवसांपूर्वीच कागल विधानसभा मतदारसंघात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाच्या वतीने समरजित घाडगे हे उमेदवार असून ते अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते.त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी कागल विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार असलेले व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आता मुस्लिम व बौद्ध धर्माच्या धर्मगुरू बरोबर एक बैठक घेऊन मराठा.बौध्द व मुस्लिम यांची एकत्रित रित्या मोट विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बांधल्या नंतर आता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.तसेच आज मनोज जरांगे पाटील.हे कुठल्या मतदार संघात कोणता उमेदवारा बाबत आज निर्णय घेणार आहेत. तसेच कोणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय जाहीर करणार आहेत.त्यामुळे राज्यातील मंत्र्यांची तसेच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची झोप उडाली आहे.अनेक जण आपल्या मतदारसंघातील प्रचार थांबवून थेट अंतरवाली सराटीत दाखल होत असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.आज थोड्या वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या गटाचे जेष्ठ नेते व मंत्री हसन मुश्रीफ हे अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत.