पुणे दिनांक ४ ऑक्टोबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर विधान सभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटचा दिवस आहे.दरम्यान राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत.या मतदारसंघात एकूण ७ हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.दरम्यान मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत.तर कोकणात उमेदवाराची संख्या अतिशय मर्यादित आहे.दरम्यान महायुती व महाविकास आघाडीत अनेक उमेदवारांनी बंडखोरी केली असून दरम्यान आज शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षां कडून बंडखोरी रोखण्यासाठी आता युद्ध पातळीवर बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तर बंडखोर उमेदवार यांनी आपल्या मतदार संघातून बाहेर गावी गेले आहेत.तसेच भ्रमणध्वनी सेवा बंद करुन ठेवला आहे.अशा बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधणं अवघड झाले आहे.काल शिर्डी येथून एका अपक्ष उमेदवाराचे त्यांच्या कुटुंबीयांसह त्याचे अपहरण करण्यात आले आहे.