पुणे दिनांक ४ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट हाती आली असून महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची आज सोमवारी निवडणूक आयोगा च्या वतीने तातडीने बदली करण्यात आली आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने रश्मी शुक्ला यांच्या बदली संदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती.तसेच शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गंभीर आरोप केला होता. की आज देखील आमचे फोन टॅप होत आहेत.तसेच रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांची महाराष्ट्राच्या पोलिस महानिरीक्षकपदी नेमणूक ही महायुती सरकारने कशी केली.असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नवीन व्यक्तीची निवड करण्यात येणार आहे.तसेच तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे एक पॅनल तयार करण्यात येणार आहे.व ते त्यांच्या अहवाल राज्याच्या सचिवांकडे देण्यात येणार आहे.व नंतर तो अहवाल राज्याचे सचिव निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.अशी माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.