Home Breaking News बारामतीत लाॅजिस्टिक पार्क, कॅन्सर रुग्णालया तर लाडक्या बहिणींना १५०० च्या जागी २१००...

बारामतीत लाॅजिस्टिक पार्क, कॅन्सर रुग्णालया तर लाडक्या बहिणींना १५०० च्या जागी २१०० देणार

127
0

पुणे दिनांक ६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या वतीने बारामती करीता जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.या जाहीरनाम्यात प्रामुख्याने यात फूड प्रोसेसिंग युनिटचं नेटवर्क स्थापन करणार.तसेच बारामतीत सुसज्ज असे लाॅजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्रात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असल्याने गरीबांसाठी मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून सुसज्ज असे कर्करोगावर उपचारासाठी रुग्णालया उभारणार.सामाजिक विकासाचा आमचा वादा, तसेच अद्यावत आरोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा वादा असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान लाडकी बहीण योजने संदर्भात राज्यातील बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये प्रति महिना देणार.राज्यात तब्बल २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करण्याचा वादा करण्यात आला आहे. तसेच राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेती पिकांच्या एम.एस.पी.वरती २०% टक्के अनुदान देण्याचा वादा जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

Previous articleभारतीय जनता पक्षाच्या वतीने ४० बंडखोरांची पक्षातून हक्कलपट्टी
Next article‘ मतदान करा, पाडापाडी करायाचीच आहे ‘ मनोज जरांगे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here