पुणे दिनांक ६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता एक खळबळजनक अपडेट हाती आली असून मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की.ज्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत त्यांनी आता मते खायचे काम करु नका.ज्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत.आता मोठ्या संख्येने मतदान करा.पण पाडापाडी करायाचीच आहे.असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले आहेत.मला समाजाचे भविष्य बघायचे आहे.मूर्ख होऊन चालणार नाही.दीडशे जणांना ऊभे केले असते.मात्र त्यांच्या साठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करु शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे.माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे.असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.