पुणे दिनांक ६ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सातारा येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून विधानसभेच्या निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर सातारा येथील शेंद्रे येथे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सदरची रक्कम पुणे ते बंगळुरू महामार्गावर सातारा पोलीसांनी कारवाई केली आहे.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका कार मधून १ कोटी रुपयांची रोकड नेली जात होती.दरम्यान कार मधून नेण्यात येणारे पैसे कोणाचे आहेत.व कशासाठी घेऊन जात होते.याचा तपास आता सातारा पोलिस करत आहेत.दरम्यान राज्यात विधानसभेचे निवडणूका राज्यात लागल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ मोठ्या रकमा पोलिसांच्या चेक नाक्यावर तसेच टोल नाक्या वर सापडताना दिसत आहे.