पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट नाशिक येथून हाती आली असून.ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करुन देतो.त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील.तसेच पैसे न दिल्यास ईव्हीएम मशिन सेट करणारे माझ्या ओळखीचे आहेत.त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगून शिवसेना उध्वव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवाराला पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.सदरच्या भामट्याला नाशिक पोलिसांनी ४ तासात अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव भगवानसिंग चव्हाण असं आहे.तो मुळचा राहणारा राज्यस्थानचा आहे.याने नाशिक येथील आमदार वसंत गिते यांच्या कार्यालयात जाऊन मी ईव्हीएम मशिन हॅक करून तुम्हाला जिंकून देतो.त्यासाठी ४२ लाख रुपये द्या. दरम्यान त्यापैकी ५ लाख रुपये आता द्या.तसेच पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझ्या ओळखीचे आहे. मशिन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन असे कार्यालयातील आनंद क्षिरसाठ यांना सांगितले.त्या नंतर नाशिक येथील मुंबई नाका पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी 👮 चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.दरम्यान या घटनेनंतर नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली आहे.