पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी वर्गा करिता अपडेट हाती आली असून.केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजना सुरू केली आहे.दरम्यान या नवीन योजने अंतर्गत दरवर्षी एकूण २२ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.यातून १० लाख रुपयांचे कर्ज ३% टक्के व्याजदराने सहजपणे उपलब्ध होणार आहे.दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना पैशाच्या कमतरते मुळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान पैशाच्या अडचणी मुळे विद्यार्थ्यांना पैशाच्या कमी मुळे उच्च शिक्षणापासून दूर राहिले नाही पाहिजेत, म्हणून केंद्र सरकारच्या वतीने ही योजना अंमलात आणली आहे.दरम्यान देशातील एकूण ८६० उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.