पुणे दिनांक ७ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंच्या कारवर दगडफेक करण्यात आली आहे.सदरची घटना नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात घडली आहे.दरम्यान हाकेंची कार अडवत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान यावेळी दगडफेकीच्या घटनेनंतर ओबीसी आंदोलक आक्रमक झाले आहेत. आम्ही पण देशाचे नागरिक आहोत.दरम्यान पोलिस जोपर्यंत कारवाई करत नाही.मी घटनास्थळावरून हालणार नाही.अशी भूमिका यावेळी लक्ष्मण हाके व ओबीसी आंदोलक यांनी घेतली आहे.दरम्यान या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.