Home Breaking News आज पहाटे हाॅलिडे स्पेशल शालिमार एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावर घसरले

आज पहाटे हाॅलिडे स्पेशल शालिमार एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावर घसरले

52
0

पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच रेल्वेच्या हाॅलिडे स्पेशल ट्रेन शालिमार एक्स्प्रेसचा भीषण अपघाताची अपडेट हाती आली असून.सिकंदराबादवरून शालिमारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे एकूण चार डबे रुळावरून घसरले आहे.सदरची घटना आज शनिवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.सुदैवाने या रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे बचाव पथक तातडीने घटना स्थळी दाखल झाले आहे.रुळावरुन घसरलेल्या डब्या मधून प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान धावत्या एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आवज आला.दरम्यान सदरची घटना ही खडगपूर रेल्वे मार्गावर घडली आहे. दरम्यान घटनास्थळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवान.व  स्थानिक पोलीस तसेच आपत्कालीन सेवा दलाचे जवान हे मदतकार्य करत आहेत.दरम्यान या अपघात मध्ये प्रवाशांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. दरम्यान सदरची घटना कशामुळे झाली.याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून घेतली जात आहे.दरम्यान छटपूजा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही  हाॅलिडे स्पेशल ट्रेन रेल्वेच्या वतीने सुरू करण्यात आली होती.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleIND vs SA पहिला टी-२० सामना आज डर्बन मध्ये
Next articleआग्रा ते लखन‌ऊ एक्स्प्रेसवर भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here