पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून गुजरात येथील नवसारी येथील एका ट्रान्सपोर्टच्या गोदामाला आज शनिवारी भीषण आग लागली.दरम्यान या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तर अन्य तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ट्रान्सपोर्टच्या गोदाम येथे ट्रक मधून केमिकलचे बॅरल्स उतरवत असताना ही आग अचानकपणे लागली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या ट्रान्सपोर्टच्या गोदामाला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन सदरच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सदरचा दुर्घटनेत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान सदरची आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्टपणे समजू शकलेले नाही.सदर घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.