पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार वकील नारायण जांभुळे यांनी केली आहे.याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.दरम्यान नामनिर्देशन अर्ज तसेच प्रतिज्ञापत्र तसेच पत्नीच्या नावाने वापरणे या बाबत बेकायदेशीर काम उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.असा खळबळजनक आरोप उमेदवार वकील नारायण जांभुळे यांनी केला आहे.