पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून.पाकीस्तान मधील बलुचिस्तान मधील क्वेटा रेल्वे स्थानकावरील प्लाॅटफार्मवर झालेल्या भीषण स्फोटात एकूण २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या स्फोटाबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बलुचिस्तान मधील क्वेटा रेल्वे स्टेशन वरील प्लाॅटफार्मवर प्रवासी हे रेल्वेची वाट पाहत स्टेशनवर थांबलेले असताना अचानकपणे मोठा भीषण असा स्फोट झाला आहे.या स्फोटात एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४६ प्रवासी हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान या स्फोटा ची जबाबदारी बलुचिस्तान मधील बलुच लिबरेशन आर्मीने जबाबदारी स्वीकारली आहे.दरम्यान रेल्वे स्टेशनवर २०० ते३०० प्रवासी हे रेल्वेची वाट पाहत असतानाच अचानक पणे हा भीषण असा स्फोट झाला आहे.या स्फोटात प्लाॅटफार्मचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तर प्रवाशांचे सामान अस्ताव्यस्त पडलेले फोटो मध्ये दिसत आहे.दरम्यान पाकिस्तान रेल्वेच्या प्रशासनाकडून या स्फोटात जखमी झालेल्या प्रवाशांचा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.