पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता एक आंतरराष्ट्रीय स्तरावरुन अपडेट हाती आली असून.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पुन्हा एकदा भारत देशाचे चांगलेच कौतुक केले आहे.यावेळी बोलताना पुतीन यांनी भारताला सुपर पॉवरच्या यादीत समाविष्ट करा.असे आवाहनच त्यांनी आता जगाला केले आहे.दरम्यान बोलताना पुतीन हे म्हणाले की भारत जगभरात मोठ्या वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.तसेच सर्वात मोठी लोकसंख्या असलेला भारत देश चांगला विकास करणार,असा विश्वास रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान भारत देश रशियाकडून शस्त्रे खरेदी करतो.तसेच दोन्ही देश मिळून शस्त्राची निर्मिती देखील करतात असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.