पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांच्या वतीने प्रचार धुमधडाक्यात सुरू आहे.दरम्यान अशाच एका प्रचार सभेत बोलताना कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की.राज्यात छत्रपतींचा एवढा द्वेष का? सुरत लुटली म्हणून का ? भारतीय जनता पार्टीच्या रक्तातच छत्रपतींबद्दल द्वेष आहे.म्हणूनच छत्रपतींचा अवमान होईल अशी वक्तव्ये भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते वारंवार करतात.अशी टीका केली आहे.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.महात्मा फुले. तसेच सावित्रीबाई फुले.यांच्यासह सर्वच महामानवांचा भारतीय जनता पार्टीने वारंवार अवमान केलाय.पण विसरु नका. महाराष्ट्र द्रोह्यांना गाडण्याच्या संधीची महाराष्ट्र वाटच पाहतोय.असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.