पुणे दिनांक ९ नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आता राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.राज्यात विधानसभा निवडणुका लागल्या नंतर आता सर्वच पक्षांच्या नेत्यां कडून प्रचार जोरात सुरू आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यासह महायुतीच्या सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे.यावेळी त्या म्हणाल्या की.राज्यातील सगळ्यात जास्त लाडकी बहीण मी आहे.पण लोकसभेत असे नव्हते.दरम्यान लोकसभाच्या निवडणुकीत सगळ्या बहिणींनी जोरात दणका दिल्यानंतरच राज्यातील सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या आहेत.असा सण सणित टोला त्यांनी महायुतीच्या सरकारला लगवला आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहिणींना पैसे दिले.पण राज्यात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.असे देखील त्यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान लातूर येथे एका प्रचारसभेत बोलताना त्या बोलत होत्या.