पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून खळबळ जनक अपडेट हाती आली असून.कोल्हापूर येथील एका जाहीर सभेत भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यातील महिलांबाबत केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक आहे.दरम्यान महाडिक यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाच्या वतीने दखल घेण्यात यावी अशी मागणी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.दरम्यान कोल्हापुरात एका सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांना दमदाटी करण्याचा प्रकार केला.दरम्यान भारतीय जनता पार्टीचा लोकशाहीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे.हे सिध्द करण्यास पुरेसा आहे. कोणत्याही पक्षाच्या रॅलीत सहभागी होण्याचा हा त्यांचा प्रश्न आहे.यासाठी कुणीही कुणावर दबाव टाकू शकत नाही.असे देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.