पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच कोल्हापूर येथून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आचारसंहिता भरारी पथकाच्या तक्रारी वरुन कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम १७१ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात एका सभेत बोलताना लाडकी बहीण योजनेचे १ हजार ५०० रुपये घेणा-या महिला ह्या काॅग्रेस पक्षाच्या रॅलीत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या.असे खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूरातील फुलवाडी येथील एका प्रचारसभेत जाहीर रित्या म्हणाले होते. दरम्यान या वक्तव्यानंतर काॅग्रेस पक्षाच्या वतीने विजय वडेट्टीवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच शिवसेना उध्वव ठाकरे गटाचे शिवसेनाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी वर चांगलीच आगपाखड केली होती.तसेच निवडणूक आयोगाने भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्याची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी केली होती.यावर बराच वाद निर्माण झाला होता.तसेच भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींची जाहीर रित्या माफी देखील मागितली होती.