पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की.देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहे.असे अमित शाह यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे आता मिंधेंना म्हणावं बस भांडी घासत,असे शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.आज उध्वव ठाकरे हे सांगोला येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी साठी आले होते.त्यावेळी ते बोलत होते. तुम्ही मन की बात करता.आम्ही जन की बात करतो.ते खोक्याची बात करतात.आम्ही जन की बात करतो. या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते गुवाहाटीत जाऊन काय 🌲 झाडी,काय डोंगर 🗻 असे म्हणत झाडी व डोंगर मोजतील,असे देखील उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.