पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच मुंबईतील धारावी येथून राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून धारावीत काॅग्रेस पक्षाचे व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले.दरम्यान धारावीत काॅग्रेस पक्षाचा व शिवसेना शिंदे गटाकडून धारावीत प्रचारा च्या दरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले यावेळी दोन्ही पक्षांच्या वतीने कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणावर घोषणाबाजी केली.तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.तसेच कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.दरम्यान धारावी विधानसभा मतदारसंघातून काॅग्रेस पक्षाच्या वतीने ज्योती गायकवाड ह्या उमेदवार आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राजेश खंदारे हे उमेदवार आहेत.दरम्यान यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने काॅग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांचे पती राजू गोडसेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.