पुणे दिनांक १० नोव्हेंबर (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज रविवारी थोड्याच वेळात अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेणार आहेत.दरम्यान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार दिला नाही. व कोणत्याही अपक्ष उमेदवार व राजकीय पक्षांना पाठिंबा दिला नाही.त्यानंतर आज जरांगे पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्व महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे.थोड्याच वेळात सकाळी १० वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे.दरम्यान मराठा समाजाने आता ज्याला पाडायचे त्याला पाडा.व ज्याला निवडून आणयाचे त्याला निवडून आणा.हा सर्वस्वी निर्णय मराठा समाजाचा आहे.मात्र त्या संदर्भात माझा निर्णय मी १० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद मध्ये देणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील हे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेचा सर्वांनी धसका घेतला आहे.